Top News

भाजप जळगाव महानगर – सरदार वल्लभभाई पटेल मंडळ क्र. ३ ची नवी कार्यकारिणी जाहीर

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सरदार वल्लभभाई पटेल मंडळ क्र. ३ च्या अध्यक्षपदी अजित राणे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांनी नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारिणीत विविध पदाधिकारी आणि सदस्यांचा समावेश करून मंडळाच्या कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी मिलिंद वाडे, योगेश वाणी, रवींद्र बारी, सुनील पाटील, अनिता पाटील, कुंदन देसले, ललित बडगुजर आणि अरुण श्रीखंडे यांची निवड झाली आहे. तर सरचिटणीसपदी अक्षय चौधरी, सह सरचिटणीसपदी तेजस काटे आणि राजेंद्र खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिटणीसपदी अभिषेक राणे, प्रीतम कुलकर्णी, भाग्यश्री वाणी, अश्विनी बिराडे, हेमंत गाजरे, श्याम पाटील, मोहन धनगर आणि दिनेश सोनार यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी केतन मेटकर, प्रसिद्धीप्रमुखपदी संभाजी शिंपी, सह प्रसिद्धीप्रमुखपदी अविनाश वाणी, सोशल मीडिया संयोजकपदी पुनम तिवारी, आयटी संयोजकपदी नील संजय चौधरी आणि कार्यालय मंत्रीपदी रूपाली देसाई यांची निवड झाली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या जाहीरतेनंतर मंडळाचे अध्यक्ष अजित राणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व सदस्यांच्या सहकार्याने मंडळाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने