जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाज, जळगाव शहर तर्फे देवीदास कॉलनी, कृपाळू शिवसाई देवस्थान येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक नागरिक व समाजबंधूंच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. हिरवाई वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या वेळी विशेष मान्यवर म्हणून 🌿 राजू सहदेव, कांजी जवडा, उत्तमचंद कडेल, जगदीश खजवनिया, संजय मौसूण, ओम जवडा, कैलास सिंघत, दीपक वर्मा, पंकज वर्मा, बाली अग्रोया, अजय वर्मा, विवेक जगताप, मनोज गुरव, प्रभु व्यास, सचिन सोनवणे, पांडेजी, प्रदीप भाऊ, दिनकर सोनवणे, हरीश वर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी वृक्षारोपण करताना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. "🌿 पर्यावरण रक्षण ही खरी समाजसेवा 🌿" हा संदेश देत उपस्थितांना वृक्षसंवर्धनाचे वचन देण्यात आले.
या यशस्वी उपक्रमासाठी सर्व सहभागी बंधूंना समाजतर्फे धन्यवाद देण्यात आले. समाजाच्या एकतेचा आणि पर्यावरणाविषयी असलेल्या जाणीवेचा हा उपक्रम ठळक नमुना ठरला.
टिप्पणी पोस्ट करा