Top News

सीमा नाफडे यांच्या आरोपांना रोहिणी खडसे यांचा जोरदार प्रतिवाद; अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी सीमा नाफडे या महिलेने केलेले आरोप फेटाळून लावत, तिच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे. त्या गुरुवारी (४ जुलै) आपल्या जळगावमधील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राजकीय हेतूने प्रेरित आरोपांचा निषेध

दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजकीय हेतूने प्रेरित होत, सीमा नाफडे यांच्याकडून रोहिणी खडसे यांच्यावर आरोप करण्यात आल्याचा दावा ॲड. खडसे यांनी केला. पीए पदावर काम केलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीचा छळ आणि धमक्यांच्या आरोपावरून फैजपूर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा राजीनामा द्यावा – खडसे यांची मागणी

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, महिला आयोगाच्या अध्यक्षा न्याय देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला. “राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी एका माजी पीएच्या पत्नीचा वापर करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप लावले गेले. यामागे ठोस राजकीय डाव आहे,” असा आरोप त्यांनी केला.

गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी – रोहिणी खडसे

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असून, गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही रोहिणी खडसे यांनी नमूद केले. “गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने