जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्हा ॲमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "जिल्हास्तरीय महारुद्र चषक" खुली मल्लखांब स्पर्धा वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक कु. चंचल माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालयाचे संचालक प्रशांत झोपे, जळगाव जिल्हा ॲमॅच्युअर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, विद्यालयाचे प्राचार्य सी. जी. तायडे, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, तसेच जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष व मुख्याध्यापक सचिन महाजन उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कु. चंचल माळी यांनी मल्लखांब व रोप मल्लखांब पूजन केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲमॅच्युअर मल्लखांब असोसिएशनचे कार्याध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक तसेच प्रायोजक प्रा. आशिषकुमार चौधरी यांनी केले.
स्पर्धा 12, 14, 17 व 19 वर्षांखालील मुलगे व मुली या वयोगटांमध्ये घेण्यात आली. प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन विजेत्यांना पदक व चषक देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय कुस्तीपटू स्व. संजय जाधव यांच्या स्मरणार्थ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निखिल भोई आणि सारा अजनाडकर यांना प्रत्येकी रु. 500 चे रोख पारितोषिक देण्यात आले.
पंच म्हणून गणेश बोदडे, धनराज भोई, सचिन चौधरी, नरेंद्र भोई, सागर चौधरी, गणेश टिंटोरे, सचिन भोळे, निखिल हजबन, तुषार जोहरे, सागर महाजन आणि प्रमोद गुमळकर यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा ॲमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व महात्मा गांधी विद्यालयातील खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल :
12 वर्षाखालील मुले :
1. अथर्व पोरवाल
2. हर्ष सोनवणे
3. अथर्व जगताप
12 वर्षाखालील मुली :
1. भावनी जाधव
2. ज्ञाना पाटील
3. विहा सराफ
14 वर्षाखालील मुले :
1. मनन छाजेड
2. नैतिक पाटील
3. जय केसवानी
14 वर्षाखालील मुली :
1. अवनी कोळी
2. नारायण चौधरी
3. आदिती बोरसे
17 वर्षाखालील मुले:
1. जय जोशी
2. ईशीत पाटील
3. आयुष्य राठोड
17 वर्षाखालील मुली :
1. किंजल सोनवणे
2. केतकी गाडे
3. अनुजा अलकारी
19 वर्षाखालील मुले :
1. निखिल भोई
2. चैतन्य जाधव
3. कुणाल राणे
19 वर्षाखालील मुली :
1. सारा अजनाडकर
2. कुशल माळी
3. पलक यादव
सांघिक निकाल :
सांघिक प्रथम (मुलगे) :
एकलव्य मल्लखांब अकॅडमी, जळगाव
सांघिक द्वितीय (मुलगे) :
हिंदवी मल्लखांब अकॅडमी, जळगाव
सांघिक तृतीय (मुलगे) :
बी. यू. एन. रायसोनी स्कूल, जळगाव
सांघिक प्रथम (मुली) :
एकलव्य मल्लखांब अकॅडमी, जळगाव
सांघिक द्वितीय (मुली) :
हिंदवी मल्लखांब अकॅडमी, जळगाव
सांघिक तृतीय (मुली) :
बी. यू. एन. रायसोनी स्कूल, जळगाव
टिप्पणी पोस्ट करा