जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने ९ ते १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे (बालेवाडी) येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील अंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी आज, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी, जळगाव येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली. ही निवड चाचणी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन आणि जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पायोनियर स्पोर्ट्स येथे पार पडली.
या निवड चाचणीमध्ये जळगाव शहर, जळगाव तालुका, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ, दीपनगर, वरणगाव, अमळनेर या ठिकाणांहून आलेल्या एकूण ७० युवा खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ३८ खेळाडूंची संभाव्य संघासाठी निवड झाली असून त्यांचे सराव शिबिर १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
या निवड चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन तसेच जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा