Top News

जळगाव जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे शानदार उद्घाटन, ७० स्पर्धकांचा समावेश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या वतीने अजिंठा रायफल क्लब जळगाव यांच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे भव्य उद्घाटन आज जळगाव शहरात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला आमदार सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष विषन मिलवाणी होते.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमधून एकूण ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि भारतीय संघ चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या भाषणात खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य आणि देशाचे नाव उज्वल केले आहे. रायफल शूटिंग या खेळात देशाला उत्तम खेळाडू मिळत असून, आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या जागेच्या संदर्भातील अडचण लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रमुख पाहुणे अशोक नखाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रायफल शूटिंगमुळे मनःशांती, निरीक्षणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते, जी गोष्टी दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेतील अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ रविवार, दिनांक १३ जुलै रोजी दुपारी तीन वाजता पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव दिलीप गवळी यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार विलास जुनागडे आणि उपाध्यक्ष प्रा. सैंदाणे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहसचिव सुनील पालवे, सदस्य प्रा. विनोद कोचुरे तसेच रेंज ऑफिसर म्हणून किरण पाटील, निलेश जगताप, नितीन अहिरे, भावेश गवळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैभव सोनवणे, पियुष गवळी, राजेश ठाकरे, पवन सोनवणे, यश चाटे, सागर गवळी, खालीद रंगरेज, रोहित तायडे, डॉ. शरद दुर्गे, रोहित विसपुते यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने