जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारात गावठी पिस्तूल आणि पाच काडतूस घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वरणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना फुलगाव शिवारातील फुलांब फाट्याजवळील एका व्यक्तीविषयी माहिती मिळाली होती. संबंधित व्यक्ती गावठी पिस्तूल व काडतूस घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी कारवाई केली.
२ जुलै रोजी दुपारी २ वाजता पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे आणि पो. कॉ. रवींद्र चौधरी यांच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे २७ हजार ५०० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो काही काळापासून फरार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा