Top News

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना जळगाव महानगरच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या पोस्टरचे भव्य विमोचन


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रोजी मातोश्री, मुंबई येथे शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या पोस्टरचे भव्य विमोचन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना जळगाव महानगरतर्फे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपनेते व जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब, शिवसेना जळगाव लोकसभा संघटक करण दादा पवार, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब कंखरे, तसेच स्वीय सहाय्यक विक्रांतजी तोरस्कर यांची उपस्थिती होती.

शिवसेना जळगाव महानगरतर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटपाचा हा उपक्रम राबविण्यात येत असून, शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला चालना देण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, "शालेय साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होईल. समाजघटकांशी जोडून राहण्याचा हा उत्तम उपक्रम आहे."

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने