चाळीसगाव, निखिल वाणी I चाळीसगाव येथून ४००० हून अधिक वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झालेली ‘विठाई एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे आज एक ऐतिहासिक व आध्यात्मिक सोहळा बनली. आषाढी एकादशीनिमित्त आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.
विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत आणि पालखीला खांदा देत गिरीश महाजन यांनी वारीला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे मोठ्या शब्दांत कौतुक केले. "जनतेच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्न पूर्ण करणारा आमदार म्हणजे मंगेशदादा. त्यांच्या नेतृत्वामुळे चाळीसगाव तालुक्याला एक दिलदार आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी मिळाला आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजप नाशिक शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे, मुकेश टेकवाणी, तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो वारकरी उपस्थित होते.
"वारी म्हणजे माझे कुटुंब – सेवा म्हणजेच विठ्ठल दर्शन" – आमदार मंगेश चव्हाण
वारीच्या निमित्ताने बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, "चाळीसगावमधील जनतेची पंढरपूरला जाण्याची इच्छा ही माझीच जबाबदारी आहे. या वारीतून हजारो भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घडवून देणे ही माझ्यासाठी सेवा असून, हाच खरा विठ्ठलाचा आशीर्वाद आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "गिरीशभाऊ महाजन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि श्री विठ्ठलाचा आशीर्वाद यामुळेच समाजकार्याला ऊर्जा मिळते."
प्रशंसांचा वर्षाव – मंगेशदादांचे कार्य नेहमीच पुढे
खासदार स्मिताताई वाघ यांनी वारीच्या उपक्रमाला अभिनंदन दिले आणि म्हटले, "चाळीसगाव मतदारसंघातील नागरिक खरोखरच भाग्यवान आहेत, की त्यांना मंगेशदादा सारखे आमदार लाभले."
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले, "दिलेले वचन पाळणारा आमदार म्हणजे मंगेश चव्हाण. विठ्ठलाचा आशीर्वाद आणि जनतेची साथ त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे त्यांचे स्थान कोणीही डगमगवू शकत नाही."
वारीसाठी उत्कृष्ट नियोजन – जेवण, पाणी, औषधे उपलब्ध
चाळीसगाव ते पंढरपूर या प्रवासात भाविकांच्या सोयीसाठी जेवणाची व्यवस्था श्री शनी महाराज मठ येथे करण्यात आली होती. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी जवळपास १२००० पाणी बाटल्या, औषधोपचार किट, आणि अन्य अत्यावश्यक सुविधा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
गेल्या एक महिन्यापासून भाजप कार्यकर्ते या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांची वारी सुखकर व निरोगी व्हावी, यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करण्यात आले.
वारीतून सेवा – सेवेतून श्रद्धा, श्रद्धेतून समाजकार्य
चाळीसगावच्या या 'वारी' उपक्रमामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी राजकीय कार्याला आध्यात्मिक सामाजिकतेची जोड दिली आहे. पंढरपूरच्या दिशेने गेलेल्या हजारो वारकऱ्यांचे मनोबल उंचावणारा, आणि एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण ठरलेली ही वारी निश्चितच अनेकांच्या मनात आदर निर्माण करणारी आहे.
टिप्पणी पोस्ट करा