Top News

जळगाव जिल्ह्यात वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जळगाव जिल्हा वंजारी समाज सेवा संस्था, मेह्रुण संचलित "जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना" यांच्या वतीने जिल्हास्तरीय वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान दिनांक ३० जून २०२५ रोजी होणार आहे.

या सत्कारासाठी वंजारी समाजातील इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षांमध्ये उत्तीर्ण व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे घेण्यात येत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी आपली माहिती खालील प्रतिनिधींना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश नाईक व नामदेव वंजारी असून, प्रमुख समन्वयक चंद्रकांत पनमलाल लाड हे असणार आहेत. विविध तालुका व विभागांतील प्रतिनिधींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा सत्कार समाजबांधवांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून, हा उपक्रम वंजारी समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणारा आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने