Top News

तब्बल सहा वर्षांपूर्वी फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला अटक

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला फुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व फुलगाव पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. आरोपी सुरेश सुपुक याने २०१९ मध्ये आपल्या मित्राचा खून करून फरार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता त्यांना एक माहिती मिळाली की, खून प्रकरणातील फरार आरोपी सुरेश सुपुक फुलगाव परिसरात दिसून आला आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख निळकंठ राठोड यांनी यावर लक्ष केंद्रित केले. तपासासाठी फुलगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांच्या टीमसह सापळा रचून आरोपीला अटक केली.

गावातील घटनाक्रमानुसार, दिवंगत शुभम याचे आरोपी सुरेश सुपुक याच्याशी पूर्वीपासून वैयक्तिक वाद सुरू होते. दिवसभरात शुभम याने काही बोलल्याने आरोपीने रागाच्या भरात शुभमला रात्री जेवणानंतर त्याच्या घरी बोलावून घेतले. जेव्हा शुभम त्याच्या घरी गेला तेव्हा आरोपी सुरेश याने शुभमला लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला व मृतदेह घरात ठेवून पसार झाला.

फुलगाव पोलिसांनी अनेक दिवस शोध घेऊन आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर २१ जून रोजी आरोपी फुलगाव परिसरात आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गुज्जर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख निळकंठ राठोड, फुलगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. अमोल पाटील, सहायक फौजदार अशोक जाधव यांचा सहभाग होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने