Top News

जळगाव जिल्ह्यात १९ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची आदेश

प्रशासकीय तसेच विनंतीवरून बदल्या; सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांचा समावेश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठा बदल करत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, दि. २३ जून रोजी एकूण १९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये ६ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १३ पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. त्यापैकी ४ अधिकार्‍यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय बदल्यांमध्ये समाविष्ट अधिकारी –

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे – यवतमाळ येथून यावल येथे

सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ – पुणे शहर येथून पाचोरा येथे

सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील – नाशिक एसीबी येथून बाजारपेठ, भुसावळ येथे

सहाय्यक निरीक्षक गणेश फड – नियंत्रण कक्ष येथून जळगाव आर्थिक गुन्हे शाखा येथे

सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे – मानव संसाधन विकास येथून एएचटीयू (AHTU) येथे


पोलिस उपनिरीक्षकांची पदस्थापना –

अशोक खेडकर – गोंदिया येथून जळगाव शहर

अविनाश राठोड – रायगड येथून रावेर

शांताराम देशमुख – जिल्हापेठ येथून पाचोरा

सुनील मोरे – यावल येथून रावेर

कुणाल चव्हाण, योगेश गणगे, सुनील चौधरी, मकसूद शेख, प्रिया दातीर – यांना एक वर्ष मुदतवाढ

समाधान गायकवाड – वाचक उपअधीक्षक, जळगाव येथून अमळनेर


विनंतीवरून बदल्या झालेल्या अधिकारी –

पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे – भुसावळ तालुका येथून मुक्ताईनगर

सहाय्यक निरीक्षक राजेंद्र चाटे – मुक्ताईनगर येथून भुसावळ तालुका

पोलिस उपनिरीक्षक मंगळू बेंडकोळी – बाजारपेठ येथून वरणगाव

पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे – चोपडा शहर येथून जळगाव गुन्हे शाखा

या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने घेतलेले हे निर्णय कार्यक्षमतेत वाढ घडवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने