जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या कुणाल अनिल महाजन (वय २३) या तरुणाने बुधवारी रात्री साडेदहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कुणाल महाजन हा आई-वडील आणि मोठ्या भावासोबत रामानंदनगर परिसरात राहत होता. तो रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री कुणाल घराच्या मागील खोलीत गेला आणि तिथे त्याने गळफास लावून घेतला.
रात्री उशिरापर्यंत कुणाल खोलीतून बाहेर न आल्याने आईने दरवाजा ठोठावला. मात्र, कुलर सुरू असल्यामुळे कुणाल गाढ झोपला असेल, असे समजून तिने पुन्हा दरवाजा ठोठावला नाही. रात्री १०.३० वाजता वडील आणि मोठ्या भावाने दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. आत गेल्यावर कुणाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
कुणालचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला, जिथे गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रामानंदनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कुणालने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
टिप्पणी पोस्ट करा