जळगाव जिल्ह्यातील आठ संघांचा सहभाग; जय अंबे फ्लावर उपविजेते; पुढील वर्षी लीग भव्य स्वरूपात आयोजित करण्याची योजना
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I बारी युवा मंच, जळगाव आयोजित पहिले बारी प्रीमियर लीग पर्व जळगावमध्ये २० ते २२ मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडले. या लीगला जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळगाव जिल्ह्यातील आठ संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली.
पिंप्राळा स्ट्रायकर्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर जय अंबे फ्लावर संघाने उपविजेतेपद मिळवले. खेळाडूंमध्ये स्पर्धा भावना वाढवण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशामागील कार्यकर्ते
या लीगच्या आयोजनासाठी बारी युवा मंचचे संतोष बारी, भूषण बारी, योगेश बारी, दत्तात्रय बारी, चेतन बारी, विशाल बारी, पुष्कर बारी आणि निलेश बोबडे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला.
दुसऱ्या पर्वासाठी व्यापक योजना
आयोजकांनी पुढील वर्षी बारी प्रीमियर लीगचे दुसरे पर्व अधिक भव्य स्वरूपात साजरे करण्याचे ठरवले आहे. यावेळी केवळ जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बारी समाज बांधवांना एकत्र आणण्याचा उद्देश ठेवला गेला आहे.
समाज बांधवांना सहभागाचे आवाहन
आगामी पर्वात महाराष्ट्रभरातील समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन बारी युवा मंचतर्फे करण्यात आले आहे. ही लीग समाजातील एकोप्यासाठी नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
बारी प्रीमियर लीग हा फक्त एक खेळाचा कार्यक्रम नसून, समाजातील ऐक्य आणि उत्साह वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा