Top News

मोठी बातमी I किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणाचा खुन

किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणाचा खून, खुनातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात घडलेल्या हत्याकांडात २० वर्षीय हेमंत सोनवणे याचा खुन करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री १२:३० वाजता घडली असून, मारेकरी रोहित गजानन लोणारी याने किरकोळ कारणावरून हेमंत याच्या पोटात चाकू घुसवून हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले व जखमी हेमंत यास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या गंभीर अवस्थेमुळे त्यास जळगाव येथे हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मारेकरी रोहित लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. रोहित याने हेमंत याचा खुन का केला, याचा पोलिस तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना किरकोळ वादातून उद्भवली असावी, परंतु अचूक कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

या घटनेमुळे शहरातील लोकांमध्ये धास्ती पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तपास वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने