जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात कॉलेजला जात असलेल्या दुचाकीला भरदार ४०७ मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. फैसल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत वासीक खान युसुफ खान (वय २०, रा. मास्टर कॉलनी जळगाव) हा जखमी झाला आहे.
जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये फैसल पटेल हा तरुण ममुराबाद रोडवरील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला ममुराबाद रोडवरून जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ४०७ वाहन क्रमांक (एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली. या वाहनात विटा भरलेल्या होत्या. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. दरम्यान फैजल हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात या घटनेबाबत नोंद घेण्याचे काम सुरू होते.
टिप्पणी पोस्ट करा