जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ मार्गावर तरसोद फाट्याजवळ गुरुवारी रात्री ९.४५ वाजता एका धावत्या कारला आग लागली. भुसावळहून जळगावकडे जात असलेल्या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते.
तरसोद फाट्याजवळील हॉटेल राधाकृष्णजवळ कारमधून अचानक धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. कार थांबवताच आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांनी दोन फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
टिप्पणी पोस्ट करा