Top News

२८ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा


जळगाव शहरातील अयोध्या नगरातील धक्कादायक घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
शहरातील अयोध्या नगरातील चिमुकले बालाजी मंदिराच्या परिसरात गुरुवारी (दि. १३) एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन रविंद्र सोनवणे (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे.

चेतन सोनवणे हा ट्रॅव्हल्स कंपनीत काम करत होता. गुरुवारी त्याची आई घराबाहेर बसली होती, तेव्हा त्याने घरात गळफास घेतला. काही वेळानंतर आई घरात गेली असता तिला चेतन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिच्या आक्रोशाने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी चेतनला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

चेतनच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने