Top News

यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह, पतीने केला तिच्यावर अत्याचार



अत्याचार करून झाली गर्भवती, पतीसह तिच्या नातेवाईकांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
यावल तालुक्यात एका १६ वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यातील एका मुलासोबत लावून दिला. मुलगी अल्पवयीन असताना तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. या प्रकरणी पतीसह तिच्या नातेवाईकांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा दोन वर्षांपूर्वी १४ वर्षे वय असताना तिच्या आई-वडिलांनी यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलासोबत विवाह लावून दिला. मुलगी अल्पवयीन असताना तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो यावल तालुक्यात वर्ग केला आहे. पीडित मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि आई यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत. या घटनेमुळे समाजात बालविवाह आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने