Top News

बोदवड शिवार येथून ट्रॉली चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; मुद्देमाल जप्त

पोलीसांनी आरोपींची  केली चौकशी, दोन ट्रॉली चोरीचे गुन्हे उघडकीस. ४ लाख ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
नांदगाव तालुका, बोदवड शिवार येथील अमोल राजाराम पाचपोळ यांच्या शेतातून ११/०१/२०२५ रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी निळ्या रंगाची ट्रॉली क्र. एमएच १९ पी ९७८७ चोरी केली होती. त्यावर बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर, त्यांना विनोद ऊर्फ स्वामी रविद्र कोळी (रा. भोरटेक ता. यावल), विनोद ऊर्फ दशरथ गोपाल कोळी, आणि वैभव ऊर्फ चाळीस हॅमत कोळी (रा. पाडळसे ता. यावल) यांच्याकडून या चोरीचा उलगडा झाला. १२/०२/२०२५ रोजी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या ट्रॉलीसह इतर मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी चोरीला गेलेली ट्रॉली, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एमएच १९ एएन ४१४७ आणि होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल क्र. एमएच १९ डीके ७१९९ अशी एकूण ४,९३००० रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.

आरोपींनी यावरून आणखी एक जुनी चोरी देखील कबूल केली आहे. २८/१२/२०२४ रोजी भालोद तालुका यावल येथून त्यांनी लाल रंगाची ट्रॉली चोरी केली होती, जी त्यांनी अमळनेर येथे विक्री केली होती. या चोरीच्या बाबत नारायण वंसत कुंभार यांनी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांचे नेतृत्वात केली गेली. या कारवाईत पोलिस निरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतूल वंजारी, विष्णू बिऱ्हाडे, हरीलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे, चालक प्रमोद ठाकूर यांचा सहभाग होता.

आरोपींना बोदवड पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने