गडचिरोली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी चार जळगाव पंचांची निवड, क्रीडा महोत्सवात महत्त्वपूर्ण भूमिका
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ क्रीडा महोत्सव (बास्केटबॉल पुरुष व महिला गट) स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील चार बास्केटबॉल पंचांची निवड झाली आहे. सचिन पाटिल, वसीम शेख, विनय काळे, जावेद शेख हे क्रीडा महोत्सवात पंच म्हणून कार्यरत असणार आहेत.
सदर स्पर्धा १७ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गोंडवाना विद्यापीठाच्या बास्केटबॉल मैदानावर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व पंच आज, गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या निवडीवर जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने शंभर कार्यकर्त्यांनी आणि जिल्हा बास्केटबॉल प्रेमींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, जयंत देशमुख, गिरीश पाटिल, जितेंद्र शिंदे यांनी सर्व पंचांना शुभेच्छा देऊन त्यांच्या यशस्वी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बास्केटबॉलच्या या क्षेत्रात जळगाव जिल्ह्याचे योगदान सदैव महत्त्वाचे राहिले आहे आणि या निवडीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची प्रतिष्ठा आणखी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा