जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप करत संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री १०:३० वाजता घडला. याप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सिद्धार्थ भीमराव जाधव याच्यावर उपचार सुरू आहे. शनिवारी रात्री १०:३० वाजता अचानक त्याच्या नातेवाइकांनी सिद्धार्थवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा दावा करत शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहेद पठाण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
डॉ. पठाण यांना थापडबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी डॉ. इमरान नजीम पठाण यांच्या फिर्यादीवरून रविवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात विक्की केजकर (रा. भुसावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती देशमुख करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा