Top News

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात

चोरट्याने दिली तीन गुन्ह्यांची कबुली, त्याच्याकडून 23 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र केले जप्त

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील जुना खेडी रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी, दुपारी २ वाजता असोदा गावातून अटक केली. आरोपीचा नाव गणेश राजेंद्र माळी (वय २९, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) आहे. त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. गणेश माळीने शनिपेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यांपासून चाललेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली. या चोरींच्या तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चाचपणी केली आणि अखेर शनिपेठ पोलिसांनी त्याला पकडले.

गणेश माळी जळगाव एमआयडीसीतील ए.के. स्विच कंपनीत रोजंदारीवर काम करत होता. कंपनीला शनिवार आणि रविवार सुट्टी असताना तो महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करत असे. चोरीसाठी तो स्वतःच्या हिरो होंडा पॅशन मोटरसायकलचा वापर करत होता.

पोलिसांनी आरोपीकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने