Top News

जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I काल संध्याकाळी पाच वाजता पद्मालय रेस्ट हाऊस येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक आयुष्यमान दिलीप अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जळगाव शहरातील तमाम समाज बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सवाचे आयोजन साजरे करण्याबाबत ठराव मांडण्यात आले. सर्व उपस्थित सदस्यांनी या ठरावास एकमताने मंजुरी दिली आणि यावर्षी जयंती जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेतला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2025 समितीचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान आशिष उत्तमराव सपकाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांनी समाजाला विश्वास दिला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा चार दिवसीय कार्यक्रम यावर्षी जल्लोषात आणि प्रबोधनात्मक स्वरूपात साजरा केला जाईल.

तसेच, उपाध्यक्ष म्हणून आयुष्यमान मोनू अडकमोल, सौ. भारतीताई रंधे, कार्याध्यक्ष म्हणून मोरे आबा यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आयुष्यमान राधे भाऊ शिरसाठ, माजी अध्यक्ष आयुष्यमान सतीश भाऊ गायकवाड, विशाल भाऊ अहिरे, हरिश्चंद्र सोनवणे सर, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक राजू मोरे, 358 ग्रुपचे संस्थापक आयुष्यमान अजय गरुड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अनिल अडकमोल, समाजसेवक मुकुंद सपकाळे, विजय सुरवाडे, आरपीआयचे शहराध्यक्ष मिलिंद सपकाळे, सचिन सरकटे सर, सागर बांगर, सौ. टीना तायडे, आयुष्यमान समाधान सोनवणे, जितेंद्र केदारे, सुमित अहिरे, एडवोकेट अभिजीत रंधे तसेच समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या एकतेचा आणि प्रगतीचा ठराव घेतला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला एक उत्तम व प्रबोधनात्मक स्वरूप देण्याचा संकल्प केला.

अशा उत्साही वातावरणात जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी सर्व समाज बांधवांचा समर्पण आणि एकजुटीची भावना दिसून आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने