Top News

जळगांवमध्ये कॅन्सरविषयक मार्गदर्शन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन


भारतीय जैन संघटनाच्यावतीने ३ फेब्रुवारी रोजी कॅन्सर सर्जन डॉ. श्रध्दा चांडक यांच्या मार्गदर्शनाने कॅन्सर, त्याच्या उपचारांवरील सखोल माहिती देणारा कार्यक्रम आयोजित

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भारतातील एक गंभीर आरोग्य समस्या म्हणजे कर्करोग, ज्याचे प्रमाण सध्या सातत्याने वाढत आहे आणि भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॅन्सर या शब्दाशी संबंधित अनेक लोकांमध्ये भिती आणि अनिश्चितता असते. त्यासाठी कॅन्सर आणि त्याच्या उपचारांसंबंधी लोकांना योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने भारतीय जैन संघटना जळगांव शहराच्या वतीने एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला आहे.


हा कार्यक्रम सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता स्वाध्याय भवन, जळगांव येथे होणार आहे. या कार्यक्रमात जळगांव शहरातील कॅन्सर सर्जन डॉ. श्रध्दा चांडक मार्गदर्शन करतील आणि कर्करोगाच्या प्रारंभ, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध याबद्दल सखोल माहिती देतील.


भारतीय जैन संघटनाच्या जळगांव शाखेचे अध्यक्ष अजय राखेचा, उपाध्यक्ष अॅड. संतोष चोपडा, सचिव सी.ए. अजयत्नेदा, कोषाध्यक्ष प्रमोद बाबदा, सह सचिव श्री. धर्मेंद्र ओसवाल, आणि जनसंपर्क अधिकारी श्री. इश्वरलालजी छाजेड यांनी कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कॅन्सरविषयक योग्य माहिती मिळवावी, अशी अपेक्षा आहे.


कॅन्सर आणि त्याच्या उपचारांसंदर्भात कोणतीही भिती न बाळगता या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे सर्वांगीण आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने