पूर्ववैमनस्यातून घडलेला खून; संशयित आरोपी फरार. पोलीस घटनास्थळी दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरात खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी ७.३० वाजता जाम मोहल्ला भागात ३२ वर्षीय तहरीन नासीर शेख याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या चार संशयितांपैकी तीन जणांनी पिस्तूल वापरून पाच गोळ्या त्याला झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृतक तहरीन नासीर शेख (वय अंदाजे ३२) याच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. प्रारंभिक माहितीच्या आधारावर, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी मिळालेल्या साक्षीदारांच्या माहितीप्रमाणे, पिस्तूलधारी संशयितांनी तहरीन शेखवर गोळ्या झाडून लगेचच फरार झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी आजचा खून घडल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून संशयित आणि मृतक यामधील पूर्वीचा वाद आणि वैमनस्य स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून, संशयितांच्या शोधासाठी विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शहरातील अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे, आणि या खुनाच्या पाश्वभूमीवर शहराच्या पोलिस यंत्रणेवर दबाव वाढत आहे.
टिप्पणी पोस्ट करा