डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगर, बृहन्मुंबई, पुणे पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती, गृह विभागाचे आदेश
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची देखील पदोन्नती झाली आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले.
गेल्या वर्षी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना या पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहे. याशिवाय अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उप आयुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा आर., तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन. टी. ठाकूर यांचा समावेश आहे.
या पदोन्नतीने संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यकुशलतेचे आणि समर्पणाचे मानांकन झाले आहे. गृह विभागाच्या आदेशाने संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाच्या प्रगतीसाठी पुढे एक मोठा टप्पा गाठला आहे.
टिप्पणी पोस्ट करा