Top News

ब्रेकिंग : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालकांची आत्महत्या


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (चोसाका) सेवानिवृत्त शेतकी अधिकारी तथा माजी प्रभारी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी (वय ६२, रा. गुरुदत्त कॉलनी) यांनी दि. २९ बुधवार रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे.

मिळालेल्या माहितीवरून यावल रोडवरील गुरुदत्त कॉलनी मधील रहिवासी असलेले (मुळगाव वडती, ता. चोपडा) चोसाकाचे माजी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी यांनी त्यांच्या राहत्या घरात दि. २९ च्या सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंजारी हे अब्दूल पिंजारी व अब्बास पिंजारी यांचे लहान बंधू तर जुनेद पिंजारी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने