Top News

मध्यप्रदेशातील तरुणावर भडगाव पोलिसांची कारवाई, १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



विना परवाना ४ गावठी पिस्टल, २० जिवंत काडतूस जप्त, एकाला अटक करून गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
भडगाव तालुक्यातील पिंपरखेडजवळ मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ गावठी पिस्टल आणि २० जिवंत काडतूस विना परवाना जप्त केले. मध्यप्रदेश येथील एक तरुण, सुनिल बिलदार बारेला (वय ३५, रा. उमर्टी, ता. बारला, जि. बडवाणी) याला १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल घेत असताना अटक केली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या जवळ संशयित आरोपीकडे ०४ गावठी पिस्टल आणि २० जिवंत काडतूस आढळले. आरोपी विना परवाना या शस्त्रांसह जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के करत आहेत.

पोलिसांना ही कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पो. कॉ. प्रविण परदेशी, पो. हे. कॉ. निलेश ब्राम्हणकार, पो. कॉ. महेंद्र चव्हान आणि पो. कॉ. संदीप सोनवणे यांच्या संयमाने शक्य झाली.  या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने विना परवाना शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी आणखी कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने