घटनास्थळी मोठा जमाव, पोलिसांकडून कारवाईची मागणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील भडगाव-वाकी रस्त्यावर आज (१२ जानेवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डंपरने समोरून येणाऱ्या म्हशींना धडक दिली. या धडकेत तीन म्हशी जागीच ठार झाली, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे.
घटना भडगाव शहरातील पेठ भागात घडली. स्थानिक पशुपालक आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात नेण्यासाठी जात होते. यावेळी वाक कडून भडगाव कडे येणारा डंपर एम एच ४३ -बीपी ७८४२ याने पॅटर्नच्या जवळ मोकळ्या रस्त्यावर म्हशींना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, तीन म्हशी डंपरच्या खाली अडकल्या. त्यांना जॅसीबीच्या साह्याने ओढून काढण्याची आवश्यकता होती.
घटनेच्या तात्काळ नंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यावेळी पोलिसांनी दाखल होऊन वाहतूक सुरळीत ठेवली आणि नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, या डंपरचा संबंध अवैध वाळू वाहतूक करण्यासोबत आहे आणि हा डंपर रस्त्यावर भरधाव वेगाने धावत होता.
घटनास्थळी उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. तथापि, डंपर मालकाच्या विरोधात आवश्यक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यामुळे स्थानिक पशुपालकांमध्ये मोठा संताप आहे. डंपरच्या चालकाला पकडून त्याच्यावर कठोर कारवाई होईल, अशी मागणी केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा