दुसरा साथीदार फरार, एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनने गावठी कट्टा, पिस्टल जप्त, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एअरगनचा वापर करुन नागरिकांमध्ये दहशत माजवित होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व पिस्टल हस्तगत करून त्याचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीवरून एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना २३ डिसेंबर २०२४ रोजी माहिती मिळाली की, शुभम अनंता राउत (वय 21), रा. भगवा चौक सुप्रिम कॉलनी, हा स्वतःकडे अग्निशास्त्र बाळगून परीसरात दहशत पसरवत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. चंद्रकांत धनके, पो.काँ. छगन तायडे, पो.शि. गणेश ठाकरे, पो.शि. शिद्धेश्वर डापकर यांचा एक पथक तयार करुन सुप्रिम कॉलनीतील तलाव परीसरात शोध घेतला.
त्यानंतर, शुभम राउतला पकडण्यात आले आणि त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे गावठी कट्ट्यासारखी एअर गन सापडली. चौकशीदरम्यान, शुभमने सांगितले की, त्याचा मित्र बंटी तायडे (रा. तायडे गल्ली, जळगाव) याच्याकडे एक पिस्टल आहे. त्यावर तातडीने बंटी तायडेचा शोध घेतला असता, तो घरावर न आल्यामुळे, पोलीसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली. यामध्ये एक गावठी बनावटीची पिस्टल सापडली.
सदरची पिस्टल जप्त करुन, शुभम राउत व बंटी तायडे यांच्यावर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राउतला अटक करण्यात आली असून, बंटी तायडेच्या शोधासाठी पोलीस कार्यवाही करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.नि. चंद्रकांत धनके व पो.काँ. योगेश घुगे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा