महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या नेतृत्वात सहल आयोजित
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I इकरा युनानी मेडिकल महाविद्यालयाने दिनांक १७/१२/२०२४ ते २२/१२/२०२४ या कालावधीत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. सहलीचे नेतृत्व महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी केले. ही सहल हैदराबाद शहरात आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
सहली दरम्यान विद्यार्थ्यांना हैदराबादमधील ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली. चाऊ मोहल्ला पॅलेस, सालार जंग म्यूझियम, चार मिनार या ऐतिहासिक वास्तू विद्यार्थ्यांना दाखवून त्यांचा ऐतिहासिक महत्त्व व निर्माण करणाऱ्यांची उद्दिष्टे सांगण्यात आली. हे स्थळ शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग होते.
सहलीमध्ये आधुनिक युगाचे प्रतीक असलेल्या रामोजी फिल्मसिटीचेही विद्यार्थ्यांना दर्शन झाले. त्याशिवाय, वंडरला वाटरपार्कमधील अत्याधुनिक लाईटिंगचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी इंजिनियरिंगच्या दृष्टीने एक महत्त्वाचे उदाहरण ठरले. एन टी आर पार्क देखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोख्त आनंद घेतला आणि शैक्षणिक अनुभव वाढवला. या सहलीत मार्गदर्शनाचे कार्य डॉ. नाजेमा खान आणि डॉ. सुमैय्या शेख यांनी केले. शाहिद शाह यांनी सहलीच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा