अज्ञात चोरट्यांच्या गोळीबारात एक जखमी, जिल्ह्यात खळबळ
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पान टपरी चालकाकडून दहा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटून त्यांनी एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मुक्ताईनगर शहरात सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील प्रतिभानगर येथील मोबाईल शॉपीचे व्यावसायिक रवींद्र रमेश खेवलकर (वय ३६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चार अनोळखी व्यक्तींनी हा हल्ला केल्याची घटना १९ डिसेंबरला रात्री १०.१५ वाजता घडली. रवींद्र खेवलकर आपल्या पानटपरीजवळ उभे असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दोन चाकूंच्या मदतीने आरोपींनी खेवलकर यांच्या हातातील पिवळ्या रंगाच्या पिशवीतील १० हजार रुपये हिसकावून नेले. या हल्ल्यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पो.नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपास पोलीस हवालदार मोहम्मद तडवी यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा