मेहरुणमध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि नामदार धनंजय मुंडे यांना राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. यानिमित्ताने लाडवंजारी समाजातर्फे जळगाव शहरातील मेहरुण परिसरात जल्लोष करण्यात आला.
मागील काही वर्षांत पंकजा मुंडे यांना पक्षातून डावलले जात असल्याच्या चर्चा ऐकायला येत होत्या. त्यांच्या नाराजीच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, आणि काही ठिकाणी त्यांना भाजपला सोडून जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु, पंकजा मुंडे नेहमीच आपल्या पक्षासोबत राहिल्या आणि त्यांच्या निष्ठेचा फळ भाजपने दिले.
लाडवंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, पंकजा मुंडे यांच्या निष्ठेचा यशस्वी परिणाम हा त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. महापौर सिमाताई भोळे, भाजप नेत्यांमध्ये भारती सोनवणे, नगरसेविका गायत्री राणे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी तसेच लाडवंजारी समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते.
समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत, लाडवंजारी समाजाने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या यशस्वी कार्याची गौरव करण्याचा आदर्श ठेवला.
टिप्पणी पोस्ट करा