Top News

जळगाव रामानंद नगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक गौतम केदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू


स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका, चार दिवसांपासून सुरू होते उपचार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कर्तव्यावर असताना ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक यांना  हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांचे रुग्णालयात उपचारावेळी दि. १५ रविवार रोजी दुपारच्या सुमारास निधन झाले.

भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६, रा. पोलीस लाईन) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असताना रविवारी दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम केदार यांना एक वर्षांपूर्वी उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती रामानंद नगर पोलीस ठाण्यात झाली होती. भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ठिकाणी कर्तव्यावर असताना, गुरुवारी सायंकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने