Top News

ट्रॅक्टरखाली दबून मॅकेनिकचा दुर्दैवी मृत्यू, एक्सल दुरुस्ती करतांना अपघात

जळगाव तालुक्यातील बोरनार गावात जॅक निसटल्याने मॅकेनिक सोमनाथ कोळीचा मृत्यू, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मंगळवारी दुपारी जळगाव तालुक्यातील बोरनार गावात एक दुर्दैवी अपघात घडला. गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल तुटला आणि त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला. ट्रॅक्टरच्या एक्सलची दुरुस्ती करण्यासाठी एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथून मॅकेनिक सोमनाथ गोरख कोळी (वय २०, रा. भातखेडा) याला सोबत घेऊन ट्रॅक्टरवर काम सुरु करण्यात आले. ट्रॉलीला जॅक लावून काम सुरू असताना अचानक जॅक निसटल्यामुळे सोमनाथ कोळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली दबला गेला.

ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने