Top News

घरफोडीच्या गुन्ह्यात अट्टल घरफोड्या करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

दहिवद गावात घरफोडी; आरोपीने कबुली देऊन २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव अपडेट न्युज, निखिल वाणी I घरफोडीच्या गुन्ह्यात असलेला अट्टल घरफोडी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्याकडून रोख रक्कम, दागिने व मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. 

दिनांक २६/११/२०२४ रोजी दहिवद ता.अमळनेर गावात दिवसा ५ जणाचे घरफोडून कपाटातून रोख रक्कम व दागने कोणीतरी अज्ञात इसमाने काढून नेले होते त्यावरुन अमळनेर पो.स्टे. CCTNS NO ५५४/२०२४ भा.न्या. संहिता ३३१(३),३०५ प्रमाणे दिनांक २७/११/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली असता सदर गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्ड वरील आरोपी प्रविण पाटील रा. बिलवाडी याने केल्याची वाटत असल्याने त्याबाबत तांत्रिक विश्लेषणावरून प्रविण सुभाष पाटील रा. बिलवाडी ता.जि. जळगाव यावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदर घटनेची कबुली देवून सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या चीज वस्तु पैकी १ लाख ९७ हजार रुपये रोख, ३६०००/- रु. किंमतीची पिवळया धातुची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली ६००००/- रु. किं.ची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण २ लाख ९३ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे. CCTNS NO ५५४/२०२४ या गुन्ह्यात अमळनेर पो.स्टे.ला जमा करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांनी केली आहे.

सदरची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने