Top News

चाळीसगाव पोलिसांनी बेकायदेशीर गॅस भरण्याचे रॅकेट केले उघड, १.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त


घरगुती गॅस सिलिंडर वापरून रिक्षांमध्ये गॅस भरताना तीन रिक्षाचालकांना अटक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता करगांव रोडलगत असलेल्या दयानंद हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार रुपये किमतीचे दोन घरगुती गॅस सिलिंडर, १५ हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे उपकरण, ८० हजार रुपये किमतीची रिक्षा व ८० हजार रुपये किमतीची तीन-चाकी रिक्षा असा एकूण १ लाख ८१ हजार रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस हवालदार संदीप शरद जाधव (३२, नेताजी चौक), रिक्षाचालक समाधान भरत मोरे (३६, डेराबर्डी) आणि रिक्षाचालक धुडकू सुकदेव वाघ (३८, डोणदिगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण घरगुती गॅस सिलिंडर वापरून रिक्षांमध्ये गॅस भरताना पोलिसांच्या पथकाच्या तावडीत आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक गणेश सायकर व त्यांच्या पथकाने केली, ज्यात हेकॉ. राहुल सोनवणे, अमित बाविस्कर, प्रवीण जाधव, भूषण पाटील, आणि पोकॉ. दीपक चौधरी यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने