पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस स्थानकाचा कार्यप्रवाह अधिक कार्यक्षम होईल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव एमआयडीसी पोलिस स्थानकातील सध्या धुरा संदीप पाटलांकडे देण्यात आले आहे. संदीप पाटील हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अनुभवी पोलिस अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्यानुसार, जळगाव एमआयडीसी पोलिस स्थानकात येणाऱ्या विविध गुन्हेगारी प्रकरणांवर त्यांचा निगराणी ठेवणे आणि पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यात समन्वय साधून काम करण्याची जबाबदारी असणार आहे.
संदीप पाटलांच्या कामकाजावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकाचा कार्यप्रवाह अधिक कार्यक्षम होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा