Top News

चाळीसगाव मच्छी विक्रेता संघाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांचा मच्छी विक्रेता संघाच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव येथील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवलेले कार्यक्षम व लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव मच्छी विक्रेता संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. स्व.तुकाराम मामा कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ कोळी, सचिव किशोर शेवरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर झोडगे, सहसचिव समाधान सोनवणे (बाबा फिटर), मच्छी विक्रेता संघाचे अध्यक्ष जिभाऊ कोळी, कोळी समाज मंडळाचे उपाध्यक्ष भारत झोडगे, देविदास सोनवणे, महेमूद दादा, अनिल सोनवणे, आनंद कोळी, आबा झोडगे, तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सत्कारानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांना आपल्या भाषणात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्या कडून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी मच्छी विक्रेते संघाच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या प्रगतीसाठी पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मच्छी विक्रेता संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली असून, त्यांचा सत्कार ही एक मोठी सामाजिक घटना ठरली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने