दोनगाव येथील बस अपघाताची वृत्त ताजी असताना आज पुन्हा बसचा अपघात, २१ प्रवासी जखमी
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा धरणगाव चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ एक भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली असून, २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचा तपशील: १४ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास धरणगाव आणि चोपडा मार्गावर पिंपळे गावाजवळ ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) रस्त्यावर उभा होता. यावेळी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) त्याला मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या धडकेत एक व्यक्ती जागीच ठार झाली तर, २१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बसचालकाची स्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जखमी प्रवासी: जखमी झालेल्यांमध्ये जाकीर शब्बीर खाटीक (वय ३५, पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय ६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय ६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय ५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय ३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय २८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय ७५, पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे (वय ४५), शरद बिलाडिया पारधी (वय ४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय ६५, नळयात), रमेश सोनू मराठी (वय ७५), कमलबाई काशिनाथ मराठे (वय ७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय २४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय ३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय ३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय ७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय ३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय ५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय ५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय ३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय ४०, जळगाव) यांचा समावेश आहे.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल: सर्व जखमींना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवन दिसले घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. अद्याप या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. अपघाताच्या बातमीची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
टिप्पणी पोस्ट करा