जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I ६७ व्या नॅशनल शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा रायफल असोसिएशनच्या १३ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या राष्ट्रीय शुटींग स्पर्धा पिस्तोल आणि रायफल स्पर्धा म्हणून दोन भागात होणार आहेत.
६७ वी नॅशनल शुटींग चॅम्पीयनशिप पिस्तोल स्पर्धा दिल्लीतील डॉ. करणसिंग शुटिंग रेंज, तुगलदाबाद येथे दि. १३ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. रायफल स्पर्धा एम. पी. शुटींग अॅकेडमी, भोपाळ, मध्यप्रदेश येथे दि. १५ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील सर्व राज्यांचे संघ, भारतीय सैन्याच्या तीनही विभागातील संघ आणि निमलष्करी दलांचे संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल, आणि सर्व प्रकारचे रायफल व पिस्तोली वापरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र संघातील निवडलेले खेळाडू पुढीलप्रमाणे:
१० मीटर एअर रायफल स्पर्धेसाठी:
१) निखिल धुडकू सपकाळे
२) प्रथमेश धनराज पाटील
३) मोहित सिवदास नाईक
४) अमोल पदमाकर इंगळे
५) गगन कमलाकर धांडे
६) अथर्व श्रीपाद कासार
७) कु. सिमरा आसिफ खान (जामनेर)
८) कु. हर्षाली राजन पाहूजा
९) कु. वैष्णवी अजय भाटीया
१०) कु. सई हिराजी कुमठेकर
११) कु. जुई हिराजी कुमठेकर
१० मीटर एअर पिस्तोलसाठी:
१२) पुष्पराज नारायण वाघ
१३) उज्वल ललीत गवळी
जळगांव रायफल असोसिएशनचे प्रमुख अधिकारी अध्यक्ष विशन मिलवाणी,
उपाध्यक्ष – प्रा. यशवंत सैंदाणे,
खजिनदार – विलास जुनागडे,
सचिव व मुख्य प्रशिक्षक – दिलीप गवळी,
नॅशनल जुरी जज्ज – नितीन अहिरे,
एन.आय.एस. प्रशिक्षक – प्रियंका पटाईत, प्रा. आसिफ खान यांनी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा