Top News

मोठी बातमी ! शिवसेनेला मिळणार ‘इतकी’ मंत्रिपदं, पहा यादी जाहीर




14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी । 
राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला 13 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे:

१) गुलाबराव पाटील  
२) उदय सामंत  
३) दादा भुसे  
४) शंभूराजे देसाई  
५) तानाजी सावंत  
६) दीपक केसरकर  
७) भरतशेठ गोगावले  
८) संजय शिरसाट  
९) प्रताप सरनाईक  
१०) अर्जुन खोतकर  
११) विजय शिवतारे  
१२) प्रकाश सुर्वे  
१३) आशिष जैस्वाल  

सध्याच्या घडीला, 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. या विस्ताराच्या वेळी, शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपला मंत्रिपदांसाठी ताटकळत ठेवले होते, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात एक मोठा लाभ होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने