Top News

Big Breaking I जळगावमध्ये डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा हायवेवर ठिय्या

संपूर्ण कुटुंब दुचाकीवर जात असताना कालिंका माता चौकात डंपरने दिली धडक, चिमुकला जागीच ठार; नागरिकांनी डंपर जाळला, पोलिसांवर दगडफेक

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील कालिंका माता मंदिर चौकात झालेल्या अपघातात एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी धडक देणाऱ्या डंपरला जाळून दिले. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करीत नागरिकांनी ठिय्या मांडला. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योजस बऱ्हाटे आपल्या आई-वडिलांसोबत आयोध्या नगरातील लीला पार्क परिसरात राहत होता. बुधवारी, २५ डिसेंबर रोजी त्याचा भाचा भक्ती आणि मामा योगेश हरी बेंडाळे यांच्यासोबत भादली येथून घरी आले होते. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास, जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे आणि योजस व भक्ती दुचाकीवर कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात योजस बऱ्हाटे जागीच ठार झाला, तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी डंपरला जाळले. डंपरची आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली आणि जमावाने ठिय्या मांडला. जमावाच्या अराजकतेमुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावरून जमाव अधिक संतप्त झाला.

घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस ताफा पोहोचला, पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने