Top News

धक्कादायक I जळगावात नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृत्यूने शाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली 

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय साई उर्फ ओम पंडित चव्हाण या नववीच्या विद्यार्थ्याने सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ओम आपल्या कुटुंबासोबत गणेश कॉलनीत वास्तव्याला होता. त्याचे आई-वडील दवाखान्यात असताना आणि आजी शेजारी गेलेली असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. ओम जळगाव शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूने शाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने