Top News

धोकादायक जिन्यामुळे तरुणाचा भीषण अपघात, व्यापाऱ्यांचा महापालिकेवर तीव्र आरोप

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गोलाणी मार्केट येथील एक धक्कादायक घटना सोमवारी, २५ नोव्हेंबर रोजी ३.१५ वाजता घडली. एका तरुणाने जिन्याचा वापर करतांना तोल गमावला व कठड्याला धरायला गेला. परंतु, जिन्याचे कठडे गंजलेले व तुटलेले असल्यामुळे त्याला आधार घेता आले नाही आणि तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. 

त्याला गंभीर दुखापती झाल्या असून त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संधीला फरदिन खान सादिक खान (वय ३२) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो कामाच्या निमित्ताने गोलाणी मार्केटमध्ये आला होता आणि काम संपवून उतरतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्याचा तोल गेला आणि कठड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र तुटलेले कठडे त्याला आधार देऊ शकले नाहीत, ज्यामुळे तो खाली पडला. त्याला चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनास्थळी तात्काळ व्यापारी आणि दुकानदार धावले आणि फरदिनला उचलून रिक्षात टाकून रुग्णालयात पोहोचवले. याप्रकरणी व्यापाऱ्यांनी महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, महापालिका केवळ कर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे, परंतु जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे. 

व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे की, तुटलेल्या जिन्यांचा आणि गंजलेल्या कठड्यांचा त्वरित निचोड करून महापालिकेने यावर लक्ष द्यावे, अन्यथा असे अपघात पुन्हा होऊ शकतात. महापालिकेने संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य कारवाई करावी अशी व्यापाऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने