वैद्यकीय क्षेत्रातले समाजसेवी योगदान, डॉ. संभाजीराजे फाउंडेशनद्वारे मोफत सेवा
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I एरंडोल विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर करणारे डॉ. संभाजीराजे पाटील यांना तालुक्यातील विविध गावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्यांनी मतदारसंघातील दोन तालुके आणि एक जिल्हा परिषद गट यामध्ये प्रभावीपणे आपली ओळख निर्माण केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि समाजसेवक म्हणून असलेली प्रतिष्ठा, यामुळे त्यांना व्यापक जनसमर्थन प्राप्त झाला आहे. डॉ. संभाजीराजे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हजारो मोतीबिंदू ऑपरेशन्स मोफत केले आहेत, तसेच कोरोना काळात तीन ते चार हजार महिलांच्या डिलिव्हरी मोफत केल्या. त्याच्या या कार्यामुळे जनतेमध्ये त्यांची खूप चांगली प्रतिमा तयार झाली आहे.
त्यांच्या वाढत्या समर्थनामुळे एरंडोल, कासोदा, पारोळा यासारख्या प्रमुख मतदारसंघांमध्ये विरोधकांना धडकी भरल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेच्या मनात डॉ. संभाजीराजे यांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून बघण्याची भावना वाढलेली आहे, आणि मतदारसंघात त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे आगामी निवडणुकीत एक नवा राजकीय परिप्रेक्ष्य निर्माण होईल, अशी संभावना व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा