*चाळीसगाव तालुक्यातील साईनगर, सांगवी, पाटणा येथे खासदारांच्या कॉर्नर सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद*
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव :- चाळीसगाव मतदारसंघातील गावागावांत फक्त व मंगेशदादा आणि कमळ चीच चर्चा ऐकायला मिळत असून तालुक्यातील विकास कामांमुळे जनतेने मोठे बहुमताने मंगेशदादांनाच पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. असेच एकंदरीत चित्र दिसत असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले आहे. चाळीसगाव तालुक्यातील साईनगर (लोणजे) येथे महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ यांनी दि.१० रोजी चाळीसगाव तालुक्यातील साईनगर सांगवी पाटणा याठिकाणी महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेतल्या. त्या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत होते. गावातील आणि पंचक्रोशीतील महिला पुरुष अबालवृद्ध सगळ्यांनी उस्फुर्तपणे रॅली आणि सभांमध्ये सहभागी होत आमदार मंगेशदादा चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला. या जनतेचे मंगेश दादांवर असलेले प्रेम बघून या प्रचार सभा नाही तर विजयी मिरवणुक आहेत असं वाटत असून मतदारांनी स्वताच मंगेश दादांना पुन्हा आमदार करण्याचा निश्चय केल्याचे दिसून येत आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात जी विकास कामे झाले आहे त्या कामांना तोड नाही त्याच विकास कामांच्या बळावर आमदार मंगेश दादा पुन्हा विधानसभेत जातील यात कोणतीही शंका नाही.असेही यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा