Top News

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी महापौर जयश्री महाजन व माजी मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी सुरेशदादा जैन यांचे आशीर्वाद घेतले, विविध सहकाऱ्यांची उपस्थिती

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव नगरीचे शिल्पकार व माजी मंत्री माननीय सुरेशदादा जैन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून माजी महापौर जयश्री सुनिल महाजन व माजी मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जन्मदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांनी सुरेशदादा जैन यांच्याकडून आशीर्वाद घेतले.

यावेळी रत्नाभाभी जैन, नितीनभाऊ लढ्ढा, शरद तायडे, विजय वाणी, मेजर नाना वाणी, जयाभाभी जैन, युवासेनेचे अमित जगताप, विराज कावडिया, पियुष गांधी, विशाल वाणी आदीं सह अनेक सहकारी उपस्थित होते.

सुरेशदादा जैन यांच्या योगदानाची आठवण या वेळी सर्वांनी ताजीत केली आणि त्यांचे कार्य भविष्यकालीन पिढ्यांसाठी एक प्रेरणा ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने