Top News

आमदार मंगेश चव्हाण यांचा सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभाग; 450 किलोमीटरचा प्रवास करून अमरावती गाठली

निवडणुकीच्या कालावधीतही सहकाऱ्याच्या आनंदात सहभागी होणारा आमदार चव्हाण, शिंदे कुटुंबाच्या आनंदात सामील होण्यासाठी आमदार चव्हाण यांनी केला लांबचा प्रवास, राजकारणातील माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा आदर्श ठेवणारे आमदार चव्हाण

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I चाळीसगाव विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले असून, परिणामी 23 तारखेला निकालाची उत्सुकता आहे. अनेक उमेदवारांप्रमाणेच चाळीसगावचे विद्यमान आमदार व भाजपाचे महायुती उमेदवार मंगेश चव्हाण यांनीदेखील काही काळ विश्रांती घेण्याचे ठरवले होते. मात्र, याला अपवाद ठरले आहेत आमदार मंगेश चव्हाण.

आमदार चव्हाण यांनी दोन दिवसांची उसंती आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होण्यासाठी उपयोगात आणली. त्यांच्या कार्यालयातील सहकारी श्री. सागर शिंदे यांच्या पत्नीने 21 तारखेला कन्यारत्न प्राप्त केले. सागर शिंदे यांची सासरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे असून, शिंदे यांना प्रसूतीच्या शेवटच्या महिन्यात पत्नीची काळजी घेणं आवश्यक होतं. परंतु, निवडणुकीच्या काळात त्यांना आमदार चव्हाण यांच्या कार्यकम्यात पूर्णवेळ सहभाग दिला.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शिंदे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि स्वतःच चांदुर रेल्वे गाठण्यासाठी 450 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांचा हा चांगला निर्णय सर्व नातेवाईकांसाठी अविस्मरणीय ठरला. स्थानिक महायुती पदाधिकाऱ्यांनीदेखील तात्काळ रुग्णालय गाठून आमदार चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला.

राजकारणातील संवेदनशीलता आणि माणुसकी हरवते आहे अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. काही लोकप्रतिनिधी निवडणुकीत गरज संपल्यानंतर सहकाऱ्यांना विसरून जातात, पण आमदार मंगेश चव्हाण यांचं हे कृतीतून दाखवलेलं नेतृत्व आगळं-वेगळं ठरते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने